Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण बस आगारात ५ नवीन जिजाऊ बसेसचे लोकार्पण

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण बस आगारात ५ नवीन जिजाऊ बसेसचा लोकार्पण समारंभ युवा सेना लोकसभा चिटणीस वैभव भोईर यांच्या हस्ते व कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
कल्याण बस आगारा मध्ये अनेक कालबाह्य नादुरुस्त बसेस होत्या, त्या अनुषंगाने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना मुख्य नेते तथा तत्कालीन मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभा सभागृहात मागणी केली होती. त्या अनुषंगाने कल्याण बस आगारास परिवहन विभागाच्या मालकीच्या नवीन ५ जिजाऊ बसेस उपलब्ध झाल्या आहेत. 



या बसेसचा लोकार्पण सोहळा युवासेना लोकसभा चिटणीस वैभव भोईर यांच्या हस्ते व कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या नवीन जिजाऊ बस मुळे कल्याण मधील प्रवाशांना चांगल्या सुविधा व आरामदायी  प्रवास उपलब्ध होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यात आगार व्यवस्थापक चेतन देवधर, वाहतूक नियंत्रण राकेश जोगी,  कराळे, सहाय्यक वाहतूक नियंत्रण चौधरी, खंडागळे तसेच कल्याण बस आगारातील चालक वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments