Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सहकार पॅनलच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागा - गोपाळ लांडगे

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा व बहुजन विकास आघाडी एक जुटीने काम करत आहेत. कल्याण शहरातून या पॅनलच्या सर्व मतदारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा सल्ला शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहें. कल्याण शहरतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख निलेश शिंदे, छाया वाघमारे, यांच्या सह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही बँकेची निवडणूक जिंकाच त्यासाठी कामाला असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहें. सहकार पॅनल हे आपल्या विचाराचे पॅनल आहें. त्याना निवडून देऊन ठाणे पालघर बँकेवर एक हाती सत्ता आणू या असा आशावाद गोपाळ लांडगे यांनी वेक्त केला.  यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.





Post a Comment

0 Comments