कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळील रस्ता जलमय
विद्यार्थ्यांचे हाल, वाहनचालक त्रस्त
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवलीकरांची पावसाची प्रतीक्षा संपली असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे वातावरणात गारवा आला असून उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात आजपासून पावसाला सुरवात झाली असून आज पहिल्याच पावसाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. आज झालेल्या पावसात केडीएमसी क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळील रस्ता जलमय झाला होता.
यामुळे विद्यार्थी, नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.कल्याण आडीवली गावात कोहिनुर ईडन जवळील परिसरार नाल्याअभावी पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे नागरिकांचे हाल झाले. डोंबिवली एमआयडीसी सोनारपाडा साई बाबा मंदिरालगत रस्त्यावर केमिकलमिश्रित पाणी आले. तर एमआयडीसी परिसरात देखील नालेसफाईची बोंब पहायला मिळाली. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जातो कोट्यवधी रुपया नालेसफाईसाठी खर्च केले जातात मात्र सालाबाद प्रमाणे यंदाही पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. तर पडणाऱ्या पावसामुळे कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात रस्त्यावर झाड कोसळले. यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीसह कारचे नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हि घटना घडताच याठिकाणी अग्निशमन दलाने धाव घेत हे झाड हटविण्याचे काम हाती घेतले.
.jpg)




Post a Comment
0 Comments