शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांकडून
प्रशासनावर नाराजी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून कार्यालये, दुकाने आणि भाजी मंडईच्या इमारती उभारल्या जात असताना बाजार परिसरातील सुरक्षाविषयक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
बाजारातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मॅनहोलचे झाकण तुटल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज ट्रक, टेम्पो, दुचाकी आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. खरेदीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सुविधा शुल्क आकारले जात असताना बाजारात सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
संबंधित विभाग आणि केडीएमसी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तुटलेल्या मॅनहोलची दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही अपघाताची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी दिला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments