ड्रग्स तस्कर अब्बास इराणीला पोलिसांनी केली अटक
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंबिवली परिसरातून तब्बल १३ लाख २५ हजार रुपये किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणी ड्रग्स तस्करी करणाऱ्या अब्बास हैदर सय्यद इराणी याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाला आंबिवली परिसरात एक तरुण एमडी ड्रग्स घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दुचाकीवरून जाणाऱ्या अब्बास इराणी याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला अडवून चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान अब्बास घाबरल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीत एमडी अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच्याकडून १३ लाख २५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केला. या कारवाईनंतर अब्बास इराणी याने हे अमली पदार्थ कोठून आणले, ते कोणाला पुरविण्यात येणार होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments