प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिवसेना पक्षाचा ६० वा. वर्धापन दिन तसेच कल्याण शिवसेना विधानसभा संघटक, माजी नगरसेवक, शिवप्रभू शिक्षण प्रसारक मंडळ ( ग्लोबल लिटिल स्टार प्रायमरी स्कूल ) चे संस्थापक अध्यक्ष तथा मातोश्री अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रभुनाथ भोईर यांचा वाढदिवस आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसा निमित्त उंबर्डे येथील स्व. आत्माराम भोईर चौक येथे "माणुसकीची भिंत" या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभुनाथ भोईर यांच्या संकल्पनेत ज्यांच्या जवळ जास्त आहे उदा.अन्न-धान्य, कपडे,चपला बूट,खाण्याच्या वस्तू हे माणुसकीच्या भिंतीमध्ये ठेवावे व ज्यांच्याजवळ हे नाही ते त्यांनी विनामूल्य घेऊन जावे. या माणुसकीच्या भिंतीचे उद्घाटन विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य जयवंत भोईर यांच्या हस्ते, विद्यमान नगरसेविका सुप्रिया भोईर, माजी नगरसेविका वैशाली भोईर, माजी नगरसेविका पुष्पा भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्याचप्रमाणे आमदार जनसंपर्क कार्यालय येथे आमदार विश्वनाथ भोईर यांचे स्वीय सहाय्यक राजू केणे यांच्या संकल्पनेतून सफाई कामगार महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
शिवप्रभू शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित ग्लोबल लिटिल स्टार प्रायमरी स्कूल येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले. दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमासाठी नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेविका सुप्रिया भोईर, माजी नगरसेविका वैशाली भोईर, माजी नगरसेविका पुष्पा भोईर, अँड.मानसी भोईर, सुनिता खारुक, गुलाब भोईर, शाखाप्रमुख रावसाहेब आहेर, एकनाथ खेडकर, दीपक गायकवाड, जितेश भंडारी, मनोज झुंजारराव, स्वीय सहाय्यक राजू केणे, कार्यालय प्रमुख संतोष भोईर आदीजण उपस्थित होते.
.jpg)




Post a Comment
0 Comments