Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नालेसफाईच्या पहाणी दौऱ्यात केडीएमसी महापौरांनी अनुपस्थित अधिकाऱ्यावर नाराज

  

 "ऑफिसमध्ये बसण्यासाठी आहात की नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी?"महापौरांचा सहा.आयुक्तांना सवाल

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी या कल्याण पूर्वेतील मलंगगड रोड वरील द्वारली नांदीवली परिसरात नालेसफाईच्या कामाची पाहणी करत होत्या. यावेळी त्याठिकाणी तुंबलेले नाले पाहून महापौरांचा पारा चढला. यावेळी संबंधित प्रभागाचे अधिकारी पहाणी दौऱ्यात उपस्थित नसल्याने त्यांनी  गैरहजर अधिकाऱ्याला फोनवरच झापले. तुम्ही "ऑफिसमध्ये बसण्यासाठी आहात की नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी?"  अशी परखडपणे विचारणा महापौरांनी केली.


कल्याण पूर्वेतील द्वारली आणि नांदीवली परिसराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. महापौरांनी स्वत: हा दौरा केला. या दौऱ्यात त्या परिसरातील सहाय्यक आयुक्त उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र महापौर येऊनही अधिकारी मात्र गायब होते. सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे आणि केडीएमसीचे कर्मचारी तिथे गैरहजर होते. हे पाहाताच महापौर हर्षाली चौधरी यांचा पारा चढला. त्यांनी थेट संबंधीत अधिकाऱ्याला फोन लावत त्यांना फैलावर घेतले. 



Post a Comment

0 Comments