Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महागडे स्मार्ट मीटर विनाकारण आमच्या माथी मारू नका – रुपेश थळे

             
  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
महावितरणच्या वतीने स्मार्ट मीटर बसविले जात असून नागरिकांचा याला विरोध आहे. त्यामुळे महागडे स्मार्ट मीटर विनाकारण आमच्या माथी मारू नका, स्मार्ट मीटर सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सचिव संघटक रमेश साळवे, वाहतूक विभाग जिल्हाध्यक्ष भानुदास घुगे, प्रेमनाथ मढवी, दिनेश मढवी यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन स्मार्ट मीटर सक्ती बाबत निवेदन दिले यावेळी रुपेश थळे बोलत होते.

कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता अचानक घरोघरी स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. ज्या ग्राहकांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत त्यांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलाचा फटका बसत आहे. ग्राहकांच्या संमती शिवाय सक्तीने स्मार्ट मीटर बसवले हे ग्राहक संरक्षण कायदा आणि विद्युत नियमांच्या विरोधात आहे. जुने डिजिटल मीटर अचूक काम करत असताना विनाकारण महागडे स्मार्ट मीटर नागरिकांच्या माथी मारले जाऊ नयेत. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहिम तात्काळ थांबवावी जर प्रशासनाने मनमानी करुन सक्ती चालुच ठेवली तर तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा रुपेश थळे यांनी दिला आहे. 






Post a Comment

0 Comments