Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत 'जनसंवाद'च्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद

 

‘डोंबिवली माझं घरडोंबिवलीकर माझं कुटुंब’ – रविंद्र चव्हाण

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी डोंबिवली येथे आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी "डोंबिवली माझं घर असून येथील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहे," अशी भावना व्यक्त करत त्यांनी जनसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.
या जनसंवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, वाहतूक कोंडी तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मांडले. त्यांनी प्रत्येकाची समस्या लक्षपूर्वक ऐकून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करणे ही आपली जबाबदारी आहे. जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रकारचा ‘जनसंवाद’ नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
 


Post a Comment

0 Comments