Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"हिंदुत्वाची विश्वासार्हता त्यांनी गमावली" – खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

 

                ब्लॅक अँड व्हाईट अहिल्यानगर वार्ताहर 

तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले.यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार श्रीरंग बारणे यांचीही उपस्थिती होती.आमदार विठ्ठल लंघे व देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी स्वागत केले.हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शनी मूर्तीला तेल अर्पण करून निळे वस्त्र परिधान करण्यात आले.

शिवसंवाद यात्रेमुळे महाराष्ट्रभर शिवसेना अधिक बळकट होत असल्याचा दावा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी "हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली" असा जोरदार राजकीय आरोप केला.काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

देवदर्शन हे कोणत्याही मंत्रिपदासाठी नसून पक्षाला बळकटी मिळावी आणि राज्यात सुख-समृद्धी नांदावी, या हेतूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भरपूर पाऊस पडून राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

दर्शनानंतर जवळपास अर्धा तास भाविक व कार्यकर्त्यांसोबत छायाचित्रे आणि सेल्फी काढत संवाद साधला.कार्यक्रमाला शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments