ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदान या ठिकाणी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशान्वये परिमंडळ 3 मधील पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांची दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी फडके मैदानात मॉक ड्रिलचा थरार रंगल्याचे पाहायला मिळाले. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे विशेष प्रशिक्षण देखील याठिकाणी देण्यात आले.
या दंगा काबू योजनेमध्ये पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनचे वपोनी डॉ. अमरनाथ वाघमोडे, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वपोनी, 22 पोलिस अधिकारी, 92 पोलीस अंमलदार, 2 डीआय, 1 बिगलर, 3 सिआरएम मोबाईल, झोन 3 स्ट्रायकिंग, 1 एसआरपीएफ प्लाटुन, 1 ॲम्बुलन्स, 1 फायर ब्रिगेड वाहन सहभागी झाले होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments