Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ज्वेलरी शोरूमचे शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने लंपास

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिम येथील एका ज्वेलरी शोरूममध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील गोपाळ नगर परिसरात राहणारे मनीष मंगेश झगडे यांचे कल्याण पश्चिम येथे जिवा सिल्वर अँड गोल्ड ज्वेलरी स्टोअर आहे. 24 जून रोजी पहाटे 4.20 ते 4.47 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे लॅब-ग्रोन डायमंड जडित दागिने तसेच चांदीचे दागिने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या मालाची नेमकी किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नसून त्याचा अंदाज घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments