Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुरबाड तालुक्यातील नढई - नारीवली रस्त्याची अवस्था बिकट;

 

पावसाळ्यापूर्वी खड्डे न भरल्यास ग्रामस्थांचा जनआंदोलनाचा इशारा..

             ब्लॅक अँड व्हाईट (मुरबाड)- दिलीप पवार 

मुरबाड तालुक्यातील नढई ते नारीवली या ८ किमी लांबीच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जागोजागी मोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि धुळीमुळे हा रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रण बनला आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नढई, भुवन, भुवनपाडा, दहिगाव, शेलारी, म्हाडस, बांधिवली, नारिवली या गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे.नोकरदार,शाळकरी मुले, दूधवाले, रुग्णवाहिका आणि शेतकरी रोज याच मार्गाने ये-जा करतात. सध्या रस्त्यावर हातभर मोठे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वार खड्डे चुकवताना अनेकदा पडतात. पावसाळ्यात तर चिखलामुळे रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच नव्याने रूंदीकरणासह कॉंक्रिटीकरण झाले पाहीजे या प्रमुख मागणीसाठी गेले अनेक दिवस नढई -नारिवली रस्ता संघर्ष समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनास लेखी निवेदने दिली आहेत.तसेच प्रसार माध्यमातून बातम्या देखील प्रसारित झाल्या आहेत. याची दखल घेत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विशेष निधीतून या रस्त्यासाठी ११ कोटी रूपये निधी मंजूर केला असल्याची माहिती प्राप्त झाली असून लवकरच रस्त्याचे रूंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, असे असले तरी कामाची प्रत्यक्ष प्रशासकीय मान्यता, टेंडर प्रोसेस व कार्यारंभ आदेश मिळण्यास आणखी काही दिवस जाणार आहेत. आता पावसाळा तोंडावर आला असून सध्यस्थितिला या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघडव व धोकादायक होणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या सहनशिलतेचा आता अंत झाला असल्याचे ग्रामस्थांचे  म्हणने आहे.



ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे, “पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास  नढई फाट्यावर चक्काजाम आंदोलन करू. यासाठी सर्व  गावातील महिला-पुरुष रस्त्यावर उतरतील. होणाऱ्या गैरसोयीला प्रशासन जबाबदार राहील अशी भुमिका घेतली आहे.

दरम्यान या रस्त्यावर बांधिवली येथे नव्याने सुरू झालेल्या स्टोन क्रेशरच्या अवजड व ओहरलोड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाताहात झाली असून ही वाहतुक एकतर बंद करावी किंवा ओहरलोड चालणारे  डंपरवर मुरबाड पोलीस व आर. टी. ओ. च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी जोरदार  मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments