Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काळू–शाई धरणग्रस्तांचा मुरबाड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

 

धरणे होऊ देणार नाही ! राजू शेट्टी यांचा सरकारला गर्दीत इशारा

                  ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड वार्ताहर

प्रस्तावित काळू व शाई धरणांविरोधात धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भर उन्हात मोठ्या संख्येने धरणग्रस्त नागरिक, शेतकरी व महिला सहभागी झाल्या. यावेळी उपस्थित नेत्यांनी सरकारच्या धरण धोरणावर तीव्र टीका करत धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

मोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “काही झाले तरी काळू आणि शाई धरण होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या सरकारला अद्दल घडवण्यासाठी सर्वांनी संघटित राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या जमिनी विकू नयेत. मुरबाडची जमीन सुपीक व समृद्ध आहे, मात्र स्थानिक नेतृत्वाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक विकास योजना आणण्यात अपयश आले आहे,” असे ते म्हणाले.

"प्रस्तावित काळू धरणासाठी भूलथापा देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या" ...शेतकरी नेते राजू शेट्टी 

काळू आणि शाइ धरण कदापि होऊ देणार नाही राजू शेट्टी यांचा सरकारला गर्भित इशारा 

"सत्तेत बसलेले पुढाऱ्यांना येथील शेतकऱ्यांचा विकास दिसत नाही इथल्या शेतकऱ्यांना ओलिताखाली शेती आणण्यासाठी पाणी नाही परंतु याच भागातील शेतकऱ्यांच्या कवडीमोल किमतीने जमिनी विकत घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती बसवायचे आहेत त्यामध्ये मूळ शेतकरी कुठेच नाही यांना पिण्याचे पाणी नाही तर आणि येथील शेतकऱ्यांचा विकास दिसत नाही ज्यांना फक्त मुंबईत आलेल्या कुत्र्यांना पोहोचण्यासाठी काळू नदीवर शाही नदीवर धरण बांधण्याचा कुठे डाव आहे तो आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही."



यावेळी माजी मंत्री महादेव जानकर कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष चेतन सिंग पवार तसेच ज्येष्ठ संघर्ष नेते पोपटराव देशमुखयांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व वक्त्यांनी धरणग्रस्तांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी एकजूट राखण्याचे आवाहन केले.

तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अन्य कोणत्याही नेत्यांनी धरण प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा गर्भित इशारा दिला. धरणग्रस्तांच्या जमिनी, घरे व उपजीविकेचा प्रश्न सोडविल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाला सहमती दिली जाणार नसल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मोर्चामुळे मुरबाड शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या मोर्चामध्ये काळू शाई धरणग्रस्त संघर्ष समितीचे शेकडो कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भर उन्हामध्ये हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला होता यावेळी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून सरकारकडे सोपवणार असल्याचे यावेळी सांगितले.



Post a Comment

0 Comments