Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आमदार किसन कथोरे यांचा धरण विरोधी संघर्षाला सक्रिय पाठिंबा

 

               ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड रमेश घरत 

 ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मुंबई व ठाणे सह इतर महानगरांना पाणीपुरवठा करण्याच्या हेतुने प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसू लागताच काळू धरण बाधित शेतकरी, तळेगांव यांच्या माध्यमातून मौजे तळेगाव. येथे "शेतकरी  मेळावा " आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला असता काळू बाधित क्षेत्रातील निवडक गावातील रहिवासी आणि काळू क्षेत्राबाहेरील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.     

सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात सर्वतोपरी काळू धरण परिसरातील सर्वच रहिवाश्यांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून, संघर्षात साथ देण्याचे व पुढील काळात देखील मार्गदर्शन करण्याचे आश्वासन किसन कथोरे यांनी यावेळी दिले. बारवी प्रकल्पात झालेले पुनर्वसन हे आज राज्यातील नव्हे तर देशातील आदर्श पुनर्वसन ठरत असल्याचे आग्रही प्रतिपादन आमदार कथोरे यांनी केले.

यावेळी ठाणे जिल्हा परिषद चे माजी माजी उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले प्रस्तावित काळू धरणाला विरोध करण्याचा एकमुखी निर्धार हा पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी गरजेचा आहे. तर जनसामान्यांच्या भावना  जाणून  यापुढील काळातील सर्वच विधायक कार्याला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले तसेच एकदिलाने आणि विश्वासाने संघर्ष करण्याची गरज पवार यांनी बोलून दाखवली. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, जेष्ठ नेते सुहास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा उघडा, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, आदिवासी प्रतिनिधी राजेश शिंगवा, शाई धरण विरोधी संघर्ष समितीचे उमेश वारघडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमच्या प्रतिनिधीने मेळाव्याव्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवणाऱ्या काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता समितीचे अध्यक्ष संभाजी फनाडे यांनी,"स्थानिक लोकप्रतिधी यांनी आजच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत असल्याचे सांगितले". तर ज्येष्ठ शेतकरी नेते हरिभाऊ राऊत यांनी  "धरण हे आमच्या सर्वावर ओढवलेले मरण असून त्या आंदोलनात जर कोणी गैरसमज पसरवीत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याची हिंमत आम्हा शेतकरी वर्गात असल्याचे ठाम प्रतिपादन  केले.

तसेच आम्हा धरणाच्या संभाव्य बाधित क्षेत्रातील रहिवासी किंवा संघर्ष समितीत दुही माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांची गय करणार नसल्याचा इशारा काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे सह-अध्यक्ष पोपटराव देशमुख यांनी दिला.

Post a Comment

0 Comments