ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली संस्कृतीचे शहर म्हणून डोंबिवलीची महाराष्ट्र भारत पुण्याप्रमाणेच ओळख आहे अशा डोंबिवलीमध्ये जुन्या डोंबिवलीत काही आठवणी दडलेल्या आहेत अशा जुन्या डोंबिवलीच्या कमानीचा भूमिपूजन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कमानीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्थानिक नगरसेविका रसिका पाटील व कृष्णा पाटील यांचे सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर या प्रयत्नांना यश आले असून सदर कमानीचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.
अनेक -वर्षापासून जुनी डोंबिवली गावातील नागरिकांचे असलेले भव्य प्रवेशद्वार कमानीचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या जुनी डोंबिवली गाव प्रवेशद्वार कमानीचे भूमिपूजन रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
भूमिपूजन सोहळ्यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधि कारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जुनी डोंबिवलीच्या विकासासाठी हे प्रवेशद्वार गावाची ओळख अधिक भव्य आणि आकर्षक बनवेल, असा विश्वास व्यक्त केला.
.jpg)






Post a Comment
0 Comments