ऑनलाईन बेकादेशीर औषध विक्रीसह प्रमुख मुद्द्यांवर देशातील केमिस्टचा बंद
कल्याण डोंबिवलीसह देशभरातील 12 लाख मेडिकल दुकाने सहभागी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बेकादेशीर औषध विक्री, नियमबाह्य दिले जाणारे डिस्काउंटसह जीएसआर अधिसूचना रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया केमिकल अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आज केमिस्ट व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील सुमारे १५०० केमिस्टसह काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे तब्बल साडेबारा लाख केमिस्ट सहभागी झाले आहेत.
कल्याणमधील केमिस्ट कार्यालयापासून तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या मोर्चात केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, कल्याण शहर अध्यक्ष सागर कुलकर्णी, कल्याण शहर सचिव वीरेंद्र सिंह, ठाणे जिल्हा व कल्याण शहर कोषाध्यक्ष ॲड. गणेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि केमिस्ट सहभागी झाले होते. तर यानंतरही केंद्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील काळात बेमुदत बंद करणे किंवा आमच्या मेडिकल दुकानांच्या चाव्या केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
#ब्लॅकअँडव्हाईट#blackandwhite#KalyanDombivali
#Chemist#allIndiachemistassociation
.jpg)


Post a Comment
0 Comments