Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण जवळील बल्याणी, मोहेली परिसरात केडीएमसीची धडक कारवाई


४०० हून अधिक अनधिकृत चाळी      जमीनदोस्त, भूमाफियांचे धाबे              दणाणले,

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कल्याणजवळील मोहेली-बल्याणी परिसरात मोठी कारवाई करत अनधिकृत चाळींवर बुलडोझर चालवला. या कारवाईत तब्बल ४०० हून अधिक अनधिकृत चाळी जमीनदोस्त करण्यात आल्याने भूमाफिया आणि चाळमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.



मोहेली आणि बल्याणी परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर चाळी उभारण्याचा प्रकार सुरू होता. नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या या चाळींमुळे संपूर्ण परिसर बकाल होत चालला होता.
या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने कठोर भूमिका घेत महसूल विभाग आणि पोलिसांच्या बंदोबस्तात मोठी कारवाई हाती घेतली. जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
केडीएमसी  प्रशासनाने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून कोणालाही नियमांचे उल्लंघन करू दिले जाणार नाही.





Post a Comment

0 Comments