ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, (प्रफुल केदारे)
एका अल्कोहोलिक रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मध्यरात्री शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईक व परिचितांनी रुग्णालयातील सामानाची मोडतोड केली आणि डॉक्टर्स, परिचारिका यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता रुग्णालय प्रशासनाने निषेध व्यक्त करत सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.
टिटवाळ्यातील भगवान निंभोरे हा ४२ वर्षाचा तरुण अल्कोहोलिक आजाराने त्रस्त होता. गेली अनेक महिने तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी काल रात्री ९ वाजता दाखल केले. तातडीने उपचारही सुरू झालेही. मात्र दुर्दैवाने डॉक्टर्स त्याला वाचवु शकले नाही. आणि मध्यरात्री तो रूग्ण १ वाजता मरण पावला. यानंत, अनावर झालेल्या त्याच्या १ महिला व दोन तरुण अशा नातेवाईकांनी मध्यरात्री रुग्णालयात मोठा गोंधळ घातला.
रुग्णाचे नातेवाईक आणि परिचितांनी रुग्णालयात शिवीगाळ करत केबिन ,टेबल, खुर्च्या,व्हेंटिलेटर, गोळ्या औषधांची नासधुस केली.
तसेच डॉक्टर्स आणि नर्स यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे, आता रुग्णालय कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. आम्ही काम करावे कसे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. याविरोधात कर्मचारी डॉक्टर्स नर्सेस यांनी सकाळी निदर्शने करत आपला निषेध व्यक्त केला.
या संदर्भात शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी पोलिसांत तक्रार देत प्रशासनाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय. आणि अशा उपद्रवी नातेवाईकांवर कारवाई होऊन डॉक्टर नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याने तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
.jpg)


Post a Comment
0 Comments