Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येचा अंबरनाथमध्ये निषेध

   

               ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ (प्रफुल्ल केदारे )

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद अंबरनाथमध्ये उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी अंबरनाथमधील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि महिला मंडळांच्या प्रतिनिधींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन प्रशासनाला निवेदन दिले. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

​अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सादर केलेल्या निवेदनात नागरिकांनी महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमुखाने केली.

​या निषेध आंदोलनात भारतीय जनता पार्टी अंबरनाथ, ब्राह्मण संघ, ब्राह्मण सभा, हेरंब सेवा समिती, हेरंब रहिवासी संघ, भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती, भ्रमण मंडळ, सुयोग महिला मंडळ, मनोहर महिला मंडळ, योगिनी महिला मंडळ आणि अंबरनाथ व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.



Post a Comment

0 Comments