Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सफाई कामगारांचा जीव धोक्यात घालून नालेसफाई

          नालेसफाईच्या कामासाठी                            यंत्रसामुग्रीचा अभाव

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मध्यम छोट्या स्वरूपाच्या गटारी नालेसफाई कामांचा १० प्रभागनिहाय नुसार प्रत्येक प्रभागानुसार १० लक्ष असे सुमारे १ कोटी कामाची  निविदा प्रक्रिया अद्याप देखील मार्गी लागल्या नसल्याने छोट्या मध्यम स्वरूपाच्या गटारे नालेसफाई कामासाठी मनपा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण आला असून या सफाई कर्मचाऱ्यांकडे यंत्रसामुग्री तसेच सेफ्टी साधनांचा अभाव पाहता जीव धोक्यात घालून काम करण्याचा प्रसंग ओढावला आहे.   


 

पावसाळ्या पूर्वी पावसाळ्यानंतर मध्यम छोट्या स्वरूपाच्या गटारे, नाले सफाई कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून प्रभागनिहाय १० पैकी ५ कामांच्या निविदा प्रक्रियांमध्ये ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे फेरनिविदा प्रक्रिया करण्यामुळे हि कामे मार्गी लागू न शकल्यामुळे   छोट्या, मध्यम स्वरूपाच्या गटारी, नालेसफाईसाठी कंत्राटी कामगार अजून न आल्याने मनपातील कायमस्वरूपी असलेल्या कामगारांना गटार साफ करावी लागत आहे. यंत्र सामुग्री नसल्याने जीव धोक्यात घालून नाल्यात उतरावे लागत आहे. यांचा प्रत्यय  सहजानंद चौक परिसरातील, शुभम अपार्टमेंट, जिजामाता काँलनी आदी परिसरातील रस्त्यालगतचे चेबंर साफ करण्यासाठी साधनसामग्रीचा अभाव पाहता, जीव धोक्यात घालून गटारे साफ करण्याची वेळ आली आहे.

या संदर्भात घनकचराव्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य निरक्षक यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. संभाव्य बंदिस्त गटारातील चेंबर साफ करताना संभाव्य गटारीतील गॅस मुळे मोठी दुर्घटना घडल्यास यांस जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. 

                                            
जनि, मनि, कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यांच्याशी संपर्क साधला असता प्रभागनिहाय  १० प्रभागातील छोट्या मध्यम स्वरूपाच्या गटारे नालेसफाई कामासाठी प्रभागनिहाय १० लक्ष रू. कामाच्या ,प्रत्येक प्रभागनुसार एकंदरीत १ कोटी रू. निविदा प्रक्रिया काढण्यात आल्या होत्या.  परंतु १० पैकी ५ निविदा प्रक्रियेला ठेकेदाराकडून प्रतिसाद न लाभल्यामुळे फेर निविदा काढण्यात आल्या असून येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया पार पडेल. तसेच तोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून उप आयुक्त घनकचरा यांच्या मार्गदर्शनाखाली छोट्या मध्यम स्वरूपाच्या गटारे, नालेसफाईची कामे मनपा सफाई कर्मचाऱ्यां मार्फत सुरू असल्याचे सांगितले.                

मोठ्या नालेसफाई कामापैकी काही कामे २०टक्के पेक्षा जास्त बिलो जात, प्रत्यक्ष कामे देखील सुरू झाली. या मोठ्या नालेसफाई काम़ाचा आयुक्त आणि महापौर यांनी पाहणीदौरे देखील सुरू केले असले तरी छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या गटारे नालेसफाई कामांना मुहूर्त कधी लागणार, यामध्ये काही गौडबंगाल आहे का, अशा चर्चा यानिमित्ताने रंगल्या आहेत.


Post a Comment

0 Comments