Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये अग्निशमन दलाची गाडी नाल्यात अडकली

वादळानंतर अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्यात अडथळा

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

वादळी वाऱ्यांमुळे कल्याणमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अरुंद रस्ते आणि जुन्या भागांतील अतिक्रमणांमुळे बचावकार्यात अडथळा आला. झाड हटवण्यासाठी निघालेली एक मोठी अग्निशमन गाडी टिळक चौक परिसरातील नाल्याच्या झाकणात अडकली. गाडी बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. अखेरीस, जेसीबीच्या मदतीने ती गाडी नाल्यातून यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, आपत्कालीन परिस्थितीत शहराच्या रस्ते नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.




Post a Comment

0 Comments