Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबरनाथच्या सत्तांतरणास अनपेक्षित वळण


             ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ, (प्रफुल केदारे) 


अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर पक्षीय बलाबलानुसार आघाडींची नोंदणी करण्यावरून संभ्रमात असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर आज दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून शिवसेनेच्या बाजूने मताधिक्य असलेल्या गट म्हणून निर्वाळा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संख्याबळाच्या राजकीय घडामोडींना अखेर निर्णायक वळण मिळाले असून हा निकाल शिवसेना (शिंदेगट )च्या बाजूने जिल्हाधिकारी यांनी दिलाय.
मुंबई उच्च न्यायालयातील रिट पिटीशन ८३३/२०२६ दिनांक १९/१/२०२०६ रोजीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी गेल्या पाच महिन्यात ५ वेगवेगळा तारखा देऊन शिवसेना (शिंदे गट) चे  गटनेते रवी करंजुले आणी भाजप चे गटनेते अभिजित करंजुले यांचे  तथा अन्य दोन्ही राजकीय पक्षांचे नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्या नंतर आज अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना हा मोठा संख्याबळ असलेला पक्ष असून शिवसेनाच्या बाजूने निकाल दिला यामुळे शहरातील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
अंबरनाथ नगरपालिकेत  शिवसेना २७  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४,आणि अपक्ष १ असे एकूण ३२ नगरसेवक आहे. 
तर भाजप  १४,भारतीय काँग्रेस १२, अपक्ष १,आणी १,थेट नगराध्यक्षा असे २८ चे पक्षीय बलाबल आहे. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी ७/५/२०२५  रोजी काढलेल्या आदेशानुसार शिवसेना च्या ३२ हे संख्यांबळ कायम ठेवून शिवसेना या पक्षास मोठा गट अशी मान्यता दिली आहे 
         नगरपरिषदेत सत्ता समीकरणांवर या निकालाचा थेट परिणाम होणार असून आगामी सभांमध्ये वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया :
" विकास आघाडी स्थापन केल्यानंतर ३० दिवसाच्या आत आघाडीतून विभक्त होऊन वेगळ्या गटात सामील होण्याची तरतूद आहे यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ नगरसेवक यांना काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केल्याचे लक्षात येताच, ते या आघाडीतून बाहेर पडले आणि पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत सामील झाले. नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी आपल्या पिठासीन पदाचा गैरवापर करून भाजपला मोठा गट म्हणून घोषित केले. भाजप या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिले होते. त्यानुसार अखेर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी  शिवसेनेलाच नगरपालिकेतील मोठे संख्याबळ असल्याचा गट म्हणून घोषित केले त्यामुळे विजय हा सत्याचा आहे." 
     -- अरविंद वाळेकर ( माजी नगराध्यक्ष शिवसेना शहर प्रमुख अंबरनाथ)

Post a Comment

0 Comments