डोंबिवलीकरांना स्वस्तदरात दंतचिकित्सा उपलब्ध
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महागड्या दंतचिकित्सेमुळे अनेक नागरिक उपचार घेणे टाळतात. हीच गरज ओळखून कमी दरात आणि आधुनिक सुविधांसह दंतसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आदी’ या डेंटल उपक्रमाची दुसरी शाखा डोंबिवलीत सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेती राहुलनगर येथे शुक्रवारी या शाखेचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी डॉ. दीपा कांबळी, डॉ. श्रीदाय कांबळी, डॉ. सिद्धी भोसले, डॉ. निपुण सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकर डॉ.अमेय कांबळी यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. श्रीदाय लहान असताना त्याची आजी त्याला उद्यानात घेऊन यायची. संघ विचारांची असलेल्या त्या आजी त्याला नेहमी चांगले संस्कार द्यायच्या. त्यांच्या मुलाने म्हणजे डॉ अमेय कांबळी यांनी डॉक्टर होऊन समाजासाठी काम करण्याचा मार्ग निवडला, ही अभिमानाची बाब आहे. डॉक्टर हे अत्यंत नोबल प्रोफेशन असून डॉ. कांबळी कमी दरात सेवा देण्याचा सातत्याने विचार करत आहेत,” असे ते म्हणाले.
‘आदी’ हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून कोपर परिसरात सुरू असून नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. या क्लिनिकमध्ये नागरिकांना दंतचिकित्सेवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि परवडणारे उपचार यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे डॉ. कांबळी यांनी सांगितले.
डॉ. अमेय कांबळी यांनी सांगितले की, “गेल्या २५ ते २६ वर्षांपासून आम्ही डोंबिवलीत प्रॅक्टिस करत आहोत. समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ‘आदी’ सुरू केले. याआधी आम्ही राज्यभर मोफत दातांची कवळी बसवण्याचा उपक्रम राबवला होता. शंभरहून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. आता हे काम अधिक व्यापक स्वरूपात कायमस्वरूपी क्लिनिकच्या माध्यमातून सुरू राहणार आहे.”
.jpg)



Post a Comment
0 Comments