सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मुरबाड शंभू दुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे १ मे २०२६ रोजी वर्धापन दिनानिमित्त खडवली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली राजू पाटील यांची शंभू दुर्ग संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
वैशाली पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेच्या भविष्यातील उपक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली.
.jpg)


Post a Comment
0 Comments