ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अखिल भारतीय साहित्य परिषद दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने रविवार दि. ३ मे २०२६ रोजी नूतन विद्यालय कल्याण येथे राष्ट्रसाधनेवरील काव्य संध्येचा कार्यक्रम मोठ्या आनंद उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कल्याण जिल्हा संघचालक नितीन शिंत्रे यांनी भूषविले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेश प्रताप सिंग हे होते. यावेळी विशेष निमंत्रित कवी स्वदीप्ती स्वाती नातू, शारदासुत सुनील म्हसकर, डॉ. वैभव दातार, अजय पाटील, शिवकुमार सिंह, सत्यभामासिंह, सुदर्शन जोशी, शिरीष मोराणकर व डॉ. स्मिता महाजन या सुप्रसिद्ध कवींनी राष्ट्र धर्म, राष्ट्रीय एकात्मता, सनातन संस्कृती, मानवता, आतंकवाद, देशभक्ती व संघ साधना आदि विषयांवर अतिशय सुंदर सुंदर काव्यरचना सादर करून उपस्थित काव्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन निमंत्रित कवींचा मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण शाखा अध्यक्ष प्रा. नारायण फडके यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांत कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले तसेच डॉ. चंद्रशेखर भारती यांची डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावरील कविता सादर केली. यावेळी सत्यभामासिंह यांनी सरस्वती वंदना, सुमीता भोसले यांनी परिषद गीत सुंदर प्रकारे सादर केले. जयरामन गणपती व डॉ. शामसुंदर पांडेय यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले. तर कल्याण शाखा अध्यक्ष प्रा. नारायणराव फडके यांनी मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. दिनेश प्रताप सिंग व कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन शिंत्रे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी साहित्य भारती कोंकण प्रांतातील डॉ. योगेश जोशी, डॉ. रत्नाकर फाटक, डॉ. रवींद्र पाठक, प्राजक्ता कुलकर्णी, प्रा. संतोष शर्मा, अधिवक्ता मंगला कांगणे, राकेश त्रिपाठी, नंदा कोकाटे, रवींद्र पानसरे, रूपाली राऊत, उल्का पाटील, प्राचार्य प्रशांत जाधव, प्रदीप चव्हाण, प्रमोद इरमुलवार, गीतांजली म्हसकर, तानाजी लोंढे, प्रा. महेश थोरात, जयंत पाटील आदि कल्याण, शहापूर, पालघर, नवी मुंबई, ठाणे येथील साहित्य भारतीचे सभासद व कवी, कवयित्री, रसिकजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच केशवनगर मधील कार्यवाह उत्कर्ष टोणपे, अमेय नायर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दीपक नेरकर, संघ स्वयंसेवक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय रंगतदार व बहारदार झाला. राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला.
.jpg)

Post a Comment
0 Comments