Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वाशिंदच्या त्या बोगस शाळांवर कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

कारवाई न केल्यास अण्णा साळवे यांचा आंदोलनाचा इशारा...

             ब्लॅक अँड व्हाईट शहापूर (दिलीप पवार)

वासिंद परिसरातील आर. के. पालवी स्कूल व श्री लॉर्ड गणेशा स्कूल (CBSE) या दोन शाळांविरुद्धची गंभीर तक्रार थेट जिल्हा परिषद ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार अण्णा मोतीराम साळवे यांनी यापूर्वी शिक्षण विभाग व पंचायत समिती स्तरावर वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. माहिती अधिकारातूनही समाधानकारक माहिती न मिळता अपूर्ण व उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तक्रारीनुसार, या शाळांकडे शासनाने ठरविलेल्या जागेच्या अटी, आवश्यक सुविधा व प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असून काही ठिकाणी शाळा अयोग्य जागेत/गाळ्यांमध्ये चालविल्या जात असल्याचे समोर येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट खेळ होत असल्याची तीव्र भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

या प्रकरणात संबंधित प्रशासन — विशेषतः गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शहापूर व शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे — यांच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कारवाई का होत नाही? कोणाला संरक्षण दिले जात आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत.

तक्रारदाराने शाळेची सखोल चौकशी करून मान्यता रद्द व संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून, यासोबतच निष्क्रिय अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

"विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सहन केला जाणार नाही; तात्काळ कारवाई करा, अन्यथा आंदोलन अटळ!" असा थेट इशारा अण्णा साळवे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments