Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नाल्यासाठी काँक्रिट रस्ते तोडायची मालिका सुरूच एमआयडीसी कावेरी चौक जवळील रस्ता तोडल्यामुळे वाहतुकीस बंद

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील नवीन काँक्रिट रस्ते तोडायची मालिका सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांपासून कावेरी चौक ते आजदे गावाकडे जाणारा रस्ता हा नवीन नाल्याच्या बांधकामासाठी तोडण्यात आल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र काही दुचाकीवाले त्यातूनच धोकादायक पद्धतीने आपल्या दुचाकी नेत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.


 एमआयडीसी ठेकेदारांकडून हे काम चालू असून एमआयडीसी मधील अनेक रस्ते हे पुढे तोडण्यात येणार असल्याचे समजले आहे. यामुळे नागरिकांत चीड व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्हाला नाले, गटारी नवीन बनवायच्या होत्या तर काँक्रिट रस्ते बनवायच्या आधी का नाही हे बनवून घेतले असा प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत. परंतु याचे उत्तर ना प्रशासनाकडे ना लोकप्रतिनिधीकडे ना राजकीय पुढाऱ्यांकडे असल्याने नागरिकही आता हतबल झाले आहेत.
 

Post a Comment

0 Comments