Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्र दिनी अवयवदान जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

डोंबिवलीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने लोकवर्गणीतून आयोजित केलेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शुक्रवारी सकाळी  डोंबिवली (पूर्व) येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यामध्ये सानिका गंधे, माधुरी कोरडे तसेच ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आयुष तावडे आणि रॉयल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी मयंक शिगवण यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमास जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष मिलिंद बिराडे, अवयवदान जनजागृती करणारे जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे ज्येष्ठ पदाधिकारी विजयसिंह परदेशी, रमेश येवले, माजी अध्यक्षा विनिता जोशी, डॉक्टर रमेश येवले, प्रशांत प्रधान, साक्षी शास्त्रकार, तसेच नगरसेवक मंदार टावरे, नगरसेविका अलका म्हात्रे व माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत अवयवदानासारख्या पवित्र कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच असा सामाजिक उपक्रम आयोजित केल्याबद्दल व्यायाम समितीच्या कार्याचे कौतुक करून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीच्या वतीने गेल्या ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती समिती सदस्य विकास जोशी यांनी दिली. तर महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व याविषयी कृष्णा सोमार्डे यांनी प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यालयाचे प्रतिनिधी प्रकाश माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सानिका गंधे व माधुरी कोरडे यांनी केले.
या उपक्रमात अवयवदान जनजागृतीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अजित दामले, गणेश ठोंबरे, मेघा ठोंबरे आणि पलावा सिटी येथील वैशाली हिरे यांनी स्वेच्छेने अवयवदान नोंदणी अर्ज भरून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. या कार्यक्रमासाठी सुमारे १२५ ते १३० नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला

Post a Comment

0 Comments