Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुरबाड तालुक्यातील दांडी बहाद्दर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कोणाचे अभय?

 

बायोमेट्रिक मशिन बसविण्यास टाळाटाळ  का ?....

                ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड- (दिलीप पवार )

मुरबाड तालुक्यात १२६ ग्रामपंचायतीचा  प्रशासकीय कारभार सांभाळणारे ग्रामपंचायत अधिकारीच (ग्रामसेवक ) जर दांड्या मारत असतील तर गावचा कारभार कोण हाताळणार असा प्रश्न उपस्थित होत असून या दांडीबहाद्दर ग्रामसेवकांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

आज मुरबाड पंचायत समिती  येथे चिखले गावच्या महिला पाण्यासाठी मुरबाड पंचायत समिती येथे आंदोलनाला बसल्या होत्या यावेळी त्यांनी चिखले ग्रामसेवकासह तालुक्यातील ५०% ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मध्ये हजर नसतात. या ना त्या कारणासाठी मी बाहेर असल्याची कारणे नागरिकांना सांगून फसवणुक करत असतात.त्या़चे फोनही नॉटरिचेबल असतात. आज अनेक गावांमध्ये पाणी टंचाई आहे, पावसाळ्यापुर्वीची कामे रखडली आहेत, शाळेय विद्यार्थी व नागरिकांना काही कागदपत्रांची गरज भासते अशा वेळी नेमके हे महाशय सापडत नाहीत.

 काही ग्रामसेवकाकडे दोन दोन ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला असला तरी तिथेही नागरिकांना खोटेनाटे सांगून वेळ मारली जाते.शासनाच्या अध्यादेशानुसार ग्रामसेवक, तलाठी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही बहुतेकजण कल्याण, बदलापूर, अंबरनाथ सारख्या शहरात बिनधास्त वास्तव करत असल्याचे दिसत असून मुख्यालयी वास्तव्याच्या निर्णयाला हरताळ फासळा जात आहे.अशा दांडी बहाद्दर ग्रामसेवकांवर कोणाचाही वचक राहिला नसून त्यांची मनमानी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते वामन खाकर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना बायोमेट्रिक मशिन बसवणे बंधनकारक केले असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांच्याकडून घेतले आहे.त्या अनुषंगाने काही मोजक्या ग्रामपंचायती मध्ये फक्त या मशीन बसविल्या असल्याचे समोर येत असून सर्व ग्रामपंचायत मधे अंमलबजावणी का होत नाही की गटविकास अधिकारी लता गायकवाड यांचे आदेश पाळले जात नाहीत असा सवाल मुरबाड मधील नागरिक करत आहेत.या संदर्भात गायकवाड मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला असता फोन उचलला गेला नाही.

तालुक्यातील निम्याहून अधिक ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे गावच्या विकास कामांना खिळ बसत असून सध्या अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे.नागरिकांचीही कामे होत नाहीत.अशा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालण्याची वेळ आली असून सक्त कारवाई होणे गरजेचे आहे.- श्रीकांत धुमाळ, माजी पंचायत समिती सभापती **

Post a Comment

0 Comments