70 लाखांच्या फसवणूक प्रकरणात कल्याण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने डॉ.प्रसाद साली यांचा जामीन अर्ज फेटाळला
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे येथील न्यू हिरानंदानी स्टेट येथे राहणारे डॉ.प्रसाद यादवराव साली यांना 70 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. कल्याण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी, 15 मे रोजी त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर डॉ.साली यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश परवीन सैय्यद यांनी अर्ज फेटाळताना स्पष्ट केले की, "अर्जदाराने 70 लाख रुपयांच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याचा गंभीर गुन्हा केला आहे. जामीन मंजूर करण्यासाठी कोणताही सबळ आधार नाही."
या प्रकरणात डॉ. साली यांच्या पत्नी वैशाली प्रसाद साली हे देखील आरोपी आहेत. तक्रारदारांचे वकील ॲड. हरीश नायर यांनी सांगितले की, सत्र न्यायालयाने वैशाली यांचा अटकपूर्व जामीन अर्जही यापूर्वीच फेटाळला आहे. अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, तिथे त्यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी एपीआय विजय गायकवाड यांनी माहिती दिली की, 13 सप्टेंबर 2025 रोजी डॉ.राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात डॉ.साली दाम्पत्याविरुद्ध 70 लाखांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान गणेश पाटील आणि धनश्री गोडांबे यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर एपीआय गायकवाड यांनी न्यायालयात जामिनाला विरोध केला होता. ॲड. हरीश नायर म्हणाले, "अशा मोठ्या घोटाळ्यांमुळे देशाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी होते. घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी न्यायव्यवस्थेने अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे."
.jpg)

Post a Comment
0 Comments