Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवली आरपीआय आठवले गटात तू...तू...मैं... मैं


      माजी पदाधिकाऱ्याकडून जिल्हा कार्यकारिणीवर नाकर्तेपणाचा आरोप

       जिल्हाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त

            ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

कल्याण डोंबिवली आरपीआय आठवले गटात सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले.पक्षातील नाराज असलेल्या माजी कार्यकर्त्यांकडून जिल्हा कार्यकारिणीवर गंभीर टीका करतांना शहर अध्यक्षांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. टीका करतांना  आठवले गटातील माजी कार्यकर्ते माणिक उघडे यांनी  डोंबिवली  शहर अध्यक्षांवर अक्कलशून्य नेतृत्व व कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला.शहर अध्यक्षांच्या कारभारामुळेच आरपीआय आठवले गटाला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सत्तेत सहभाग घेता आला नाही.पक्षाची ताकद वाढवता आली नाही  अशा आशयाचे वक्तव्य केले होते.


त्यासंबंधी जिल्हा अध्यक्ष श्री प्रल्हाद जाधव यांनी गंभीर दखल घेत,पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा करत सांगितले की,  "जिल्हा कार्यकारिणी ही राष्ट्रीय अध्यक्षांच्या सल्ल्याने,आणि मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम करीत आहे.स्थानिक पातळीवर महापालिकेच्या राजकारणात आरपीआय  आठवले गटाला मित्र पक्षांकडून योग्य तो सन्मान आणि सहकार्य मिळत आहे.असे असतांना ज्या व्यक्तीला पक्षात कोणतेच स्थान,किंवा पद नाही, अशा व्यक्तीने पक्षाची नाहक बदनामी करणारे कोणतेही वक्तव्य करू नये."

डोंबिवली शहर अध्यक्ष श्री.....मगरे यांनी सदर "आरोप करणाऱ्या श्री.माणिक उघडे यांनी यापुढे पक्षाला बदनाम करणारे ,किंवा वैयक्तिक टीका करणारे वक्तव्य करू नये.पक्षाच्या नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल," व जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही दिला.

सदर प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रल्हाद जाधव, ॲड.सुभाष अंभोरे,युवा अध्यक्ष,जय प्रल्हाद जाधव,डोंबिवली शहर अध्यक्ष श्री किशोर मगरे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments