७ दुचाक्या केल्या हस्तगत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
दुचाकी चोरून विक्री करणारे चोरटे आतापर्यंत उजेडात आले असले तरी जाँय राईडच्या हौसेखातीर तब्बल सात दुचाकी चोरून बाईक राईडिंगची हौस करणाऱ्या चार तरूणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याण शहरात दुचाकी चोरीच्या घटना पाहता पोलीस यंत्रणा कामाला लागली असून यामध्ये बाजारपेठ पोलिसांनी तपासाअंती गेल्या एक वर्षापासून जॉयराईड साठी तब्बल सात दुचाकी चोरी करणाऱ्या ४ तरूणांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरी केलेल्या स्कुटी, अँक्टिव्हा, बर्गमन आदी दुचाकी या तरूणांनी जॉयराईडसाठी चोरल्या होत्या. हा धक्कादायक प्रकार समोर आला असून कल्याण पश्चिमेत राहणारे आरोपी समर्थ नरसु पाटील (१९), हर्ष रमेश परदेशी (२१), प्रणित दिनेश शितप (२१), रंगनाथ उर्फ सागर सुखदेव ढवळे (१८) या आरोपी चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ७ दुचाकी हस्तगत केल्या आहे.

हि कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे वपोनिरी सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक डुकळे, गुन्हे प्रकठिकरण पथकाचे सपोनिरी प्रशांत आंधळे, पो.हवा. पाटील, भालेराव, बी. आर. बागुल, पी.एम. बाविस्कर, पो.शि. ओ.बी. आंधळे, आर.ओ. ईशी यांनी केली आहे.
दरम्यान यानिमित्ताने बाजार पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेशसिंग गौड यांनी दुचाकी पार्क करताना हँन्डल लाँकसह चाकाच्या ठिकाणी चैनसह्याने अथवा वायर लॉकने लॉक करावे जेणेकरून दुचाकी चोरीच्या घटनेला आळा बसेल असे आवाहन केले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments