Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हिमगिरी प्रीमियम लीग 2026 चे दिमाखात उद्घाटन

                      ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

 हिमगिरी स्पोर्ट्सच्या मैदानावर "हिमगिरी प्रीमियम लीग 2026" चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्रीमती पल्लवी कुणाल सरमयकर, शिवसेना विभाग प्रमुख श्री कुणाल सरमयकर यांच्या सौभाग्यवती, आणि *संविधान योद्धा पुरस्कार 2025* सन्मानित, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, 17,220 फूट उंच क्षितीधर शिखर सर करणाऱ्या पहिल्या दृष्टिहीन महिला, 3 वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डधारक, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सौ. नेहा नलिन पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक करून लीगचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना समाजसेविका सौ. पल्लवीताई कुणाल सरमळकर यांनी क्रीडा क्षेत्र हे युवकांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. खेळामुळे संघभावना, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून युवकांनी क्रीडेला प्राधान्य देत निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या जीएसटी, राज्य शासन विभाग, उपनगर मुंबई येथे कार्यरत असलेल्या सौ. नेहा पावसकर AIASHA संस्थेच्या संस्थापक असून पती श्री. नलिन पावसकर व मुलगा ओम पावसकर यांच्या सोबत खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांनी गोलबॉल, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट, जलतरण, ऍथलेटिक्स या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळात दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.यावेळी परिसरातील शेकडो क्रिकेटप्रेमी, खेळाडू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाडूंच्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात लीगचा शुभारंभ झाला. 

हिमगिरी प्रीमियम लीग 2026 – सहभागी 6 संघ:* MAGNUM BOYS, FIGHTERS, LEGENDS, ROYAL STRIKERS, WARRIORS, SMASHERS



Post a Comment

0 Comments