Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खर्डीतील जीवनदीप महाविद्यालयात 200 विद्यार्थ्याना पदवी प्रदान

नवनवीन तंत्रज्ञान शिकून शिक्षणासोबत  जीवनातील नवीन गोष्टी आत्मसात करा

                                                ....केशव उपाध्याय

                  ब्लॅक अँड व्हाईट शहापूर,वार्ताहर

दैनंदिन दिवसात आपण काही ना काही शिकत असतो पदवी घेतल्यावर आता तुमच्या खऱ्या आयुष्याच्या परीक्षेला सुरवात झाली असून नवनवीन तंत्रज्ञान शिकून शिक्षणासोबत  जीवनातील नवीन गोष्टी आत्मसात करून नवीन आव्हानांना सामोरे जा तरच तुम्ही या स्पर्धेच्या युगात टीकाल व   तुमच्या वागण्या -बोलण्यात तुमच्या घरचे व महाविद्यालयाचे संस्कार दिसत असतात त्यामुळे सकारात्मक रहाण्याचे जेष्ठ पत्रकार व भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी खर्डीतील जिवनदीप महाविद्यालयातील पदवी प्रदान सोहळ्यात विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आवाहन केले.यावेळी पोलीस भरती झालेली जीवनदीपची विद्यार्थी  प्रतीक्षा हंबीर ही पोलीस भरती झाल्याने तिचा सत्कार करण्यात आला.महाविद्यालयातील पदवीधर झालेल्या 200 विध्यार्थ्याना उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

पुढील येणाऱ्या जीवनात जेजे सर्वोत्तम दिसेल त्याचे आचरण करा व चांगले ध्येय साध्य करायचे असेल तर जीवनात कितीही अडचणी येऊ द्या ध्येय सोडू नका' असे मार्गदर्शन करतांना मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक फर्डे यांनी अनेक उदाहरणांचे दाखले देत उपस्थित पदवीधर विध्यार्थ्याना  सांगितले.खर्डी परिसरातील गोरगरीब व आदिवासी मुले आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडंविंदे 134 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन  हे महाविद्यालय खर्डी येथे भाड्याच्या खोलीत सुरू केले होते आज ह्या महाविद्यालयात तीन हजाराच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

    यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाद्याय, मुंबई विध्यापिठाचे उपकुलसचिव अशोक फर्डे, जिवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे,प्राचार्य कैलास कळकटे,संचालक अनिल घोडविदे व पालक सभेचे अध्यक्ष नरेश जाधव यांच्यासह शिक्षक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments