ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित महिला नॉकआउट क्रिकेट स्पर्धेत डेक्कन फाउंडेशन संघाच्या वेदिका कुंभार्डे आणि तनुश्री जाधव यांच्या शानदार शतकांच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन फाउंडेशनने 40 षटकांत 312 धावांचा भक्कम डोंगर उभारला. संघाकडून वेदिका कुंभार्डे यांनी 81 चेंडूत 139 धावांची झंझावाती खेळी करत डावाला भक्कम पाया दिला. त्यांना तनुश्री जाधव यांची उत्तम साथ लाभली. तनुश्री यांनी 89 चेंडूत 103 धावा करत शानदार शतक झळकावले आणि संघाची धावसंख्या अधिक भक्कम केली.
312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डोंबिवली क्रिकेट क्लबचा डाव 27 षटकांत 158 धावांवर आटोपला. त्यांच्या संघाकडून कृषी गोस्वामी यांनी 34 धावा केल्या, तर आर्या कोलतेने 40 धावांचे योगदान दिले. डेक्कन फाउंडेशनच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि प्रभावी मारा करत प्रतिस्पर्धी संघावर सातत्याने दबाव ठेवला. रूपाली कोंडार यांनी 7 षटकांत 21 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. आर्या दास यांनी 5 षटकांत केवळ 5 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तर ख्यातीने 4 षटकांत 50 धावा देत 1 विकेट घेतली.
संघाचे प्रशिक्षक संतोष पाठक यांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक करत सांगितले की, “आमच्या मुलींचा खेळ उत्कृष्ट असून त्या कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत.” डेक्कन फाउंडेशनने हा सामना एकतर्फी पद्धतीने जिंकत स्पर्धेत आपली ताकद सिद्ध केली आहे... क्रिकेटमध्ये मुली करत असलेली चमकदार कामगिरी नक्कीच महिला क्रिकेटसाठी आशेचे किरण आहे.jpg)


Post a Comment
0 Comments