ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक विषय सुटावेत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री आदरणीय श्री पंकज भोयर साहेब यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करून, तत्काल शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा असे निवेदन देत सकारात्मक सविस्तर चर्चा झाली.
1) सध्या राज्यभर शिक्षकांना जनगणना, बीएलओ ड्युटी, शालेय कामकाज, विविध प्रकारचे ट्रेनिंग लागलेला आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे, एका शिक्षकाला कोणते तरी एकच काम द्यावे , अशी मागणी केली त्यानुसार शालेय शिक्षण विभाग निवडणूक विभागाशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाले.
2) दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थी संख्येचे निकष मागील बैठकीत जसे ठरले होते त्याप्रमाणेच ठेवावेत, तसेच 15, 3,2024 चा शासन आदेश रद्द करा अशा प्रकारची मागणी केली, चर्चा करून मार्ग काढतो असे ठरले.
3) डिजिटलायझेशन मुळे अनेक शिक्षक- शिक्षकेतरंचे पगार थांबलेले आहेत, तात्काळ दुरुस्ती करा, कोणाचाही पगार थांबू नका, अतिरिक्त शिक्षकांची ही पगार झाले पाहिजेत.कार्यवाही केली जाईल व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे
4) विना अनुदानावरून अनुदानित बदली पोर्टल सुरू झाले आहे त्यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. संस्था स्तरावरून माहिती भरून घ्यावी, व v c मध्ये तशा सूचना अधिकाऱ्यांना दिले जातील
5) शाळा तेथे मुख्याध्यापक मिळालाच पाहिजे, पूर्वीप्रमाणे स्टार आला पाहिजे, मुख्याध्यापक संरक्षण जीआर प्रमाणे कार्यवाही करावी अशी मागणी केली
6) आदिवासी विभागात काम करणाऱ्या शिक्षक -शिक्षकेतरना एक स्तर वेतनश्रेणी मिळावी, वेतनश्रेणी मंजुरी करता शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून तात्काळ प्रस्ताव मागवावा अशी मंत्री महोदयांनी सूचना दिली
7)सेल्फ फायनान्स म्हणून घोषित केलेल्या शाळांना अनुदानाची संधी मिळावी, शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येमुळे ज्यांना अनुदान मिळाले नव्हते, किंवा ज्यांचा टप्पा थांबवला होता, त्यांना पुढील वर्षाची पटसंख्या लक्षात घेऊन अनुदान मिळावे, शिक्षण संचालकाने तात्काळ माहिती सादर करावी अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या.
8)अनुदानित इंग्रजी माध्यमातील मान्यता प्राप्त तुकड्या व उच्च माध्यमिक वाणिज्य इंग्रजी माध्यमाला अनुदान मिळावे,
9) वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण नोंदणी करताना नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावी अशी मागणी केली होती सदरची मागणी पूर्ण केली आहे
10) अनेक दिवसांपासून संच मान्यता दुरुस्ती प्रलंबित आहे तात्काळ कॅम्प लावून संच मान्यता दुरुस्त करून मिळतील असे ठरले
11) कला क्रीडा शिक्षकांची पद पवित्र पोर्टल मध्ये भरता यावी याकरता टॅब उपलब्ध करणे, तशी तरतूद नियमावली तयार करून केली जाणार आहे.
12) त्रुटी पूर्तता केलेल्या शिक्षकांना अनुदान मिळावे
13) शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे, पूर्वीप्रमाणे मुख्याध्यापकाला संरक्षण मिळाले पाहिजे, जीआर प्रमाणे कार्यवाही करावी
14) जनगणनेचे काम उन्हाळी सुट्टीत न घेता जून महिन्यात घ्यावे, यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल
15) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थांबलेली भरती तात्काळ सुरू करावी! यासंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून प्रस्ताव आलेला आहे, शिक्षण मंत्री व शिक्षण सचिवांशी बोलून तात्काळ भरती सुरू करा
इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीसाठी उपसचिव श्री कवळे साहेब, शिक्षण संचालक श्री शरद गोसावी साहेब, सहाय्यक संचालक श्री पानझडे साहेब, भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश संयोजक प्रशम कोल्हे, प्रदेश सह संयोजक विकास पाटील, अमरावती संयोजिका संगीताताई शिंदे, अनिल बोरनारे, कोकण विभाग सह संयोजक विनोद शेलकर, मुख्याध्यापक संघाचे सागर नंदकुमार, संदेश राऊत, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत भामरे, दिगंबर बेंडाळे, विठ्ठल गोरे, दिपक राव, सुभाष खरात, किशोर सुर्वे, भारत जामनिक, रहाटे काका, अजय थुल, परिहार सर व अन्य संघटनेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments