श्री राम सेवा मंडळ कल्याण शहर
आयोजित कचोरे वस्ती हिंदू संमेलन
उत्साहात संपन्न
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
श्री राम सेवा मंडळ कल्याण शहर यांच्या वतीने कचोरे वस्ती येथे हिंदू संमेलन कार्यक्रम मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सारिका कुलकर्णी यांनी ‘महिला सहभाग आणि पंच परिवर्तन’, गौर गोपाल पाडी यांनी ‘संघ शताब्दी वाटचाल’ तर ह.भ.प. विकास महाराज बोराडे (बाळेगाव) यांनी ‘संत वांग्मय व वारकरी परंपरा’ या विषयांवर मार्गदर्शन केले. तिन्ही वक्त्यांनी देश, कुटुंब, पंच परिवर्तन व हिंदू संस्कृती या विषयांवर प्रभावी वक्तव्य करून उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी दुर्गा वाहिनीच्या मुलींनी हिंदू संस्कृतीवर आधारित गीते व पथनाट्यातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला. हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष हसमुख गुप्ता, उपाध्यक्ष गीता साबत, सचिव प्रथमेश तिवारी, खजिनदार संजीव चौधरी, उपखजिनदार संतोष पांडे व मार्गदर्शक गिरी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, राजन चौधरी, प्रकाश चौधरी, जय जयगुरूदेव गौशाळा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कबीर चौधरी, प्रदिप गायकवाड, श्याम कठोरे, श्रीराम सेवा मंडल कल्याण शहर अध्यक्ष अतिश चौधरी, सुमित पालीवाल, स्थानिक पोलिस प्रशासन, संघाचे योगेश तांबे, संतोष होळकर, डॉ. पिंगळे तसेच स्थानिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
.jpg)




Post a Comment
0 Comments