Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेत अतिक्रमणावर मोठी कारवाई

 

      69 हातगाड्या व 6 टपऱ्या हटविल्या

                              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग 5-डी क्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणाविरोधात आज कडक कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत रस्ते व फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान चक्की नाका, गावदेवी चौक, चेतना स्कूल परिसर, जिया वाइन्स, 100 फूट रोड, रिलायन्स स्मार्ट पॉइंट, विजयनगर ते आमराई तसेच तिसगाव नाका या प्रमुख भागांत मोहीम राबविण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, टपऱ्या आणि स्टॉल जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले, तर विक्रीसाठी ठेवलेला माल जप्त करण्यात आला.

महानगरपालिकेच्या या कारवाईत एकूण 69 हातगाड्या, 6 टपऱ्या आणि 5 लोखंडी स्टँड हटविण्यात आले. या मोहिमेनंतर अनेक ठिकाणी रस्ते व फूटपाथ अतिक्रमणमुक्त झाल्याचे चित्र दिसून आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईत अधीक्षक अविनाश ठाकरे, नितीन चौधरी, जयेश काळन, पथक प्रमुख उमेश जाधव, जेम्स कदम यांच्यासह पोलीस व मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments