Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज नगर, वालधुनी येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

या जयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे नृत्य, गीत सादरीकरण, तसेच विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास राजा सावंत, बाळाराम (काका) जाधव, २०२५ चे अध्यक्ष भूषण सरला रवींद्र तायडे, २०२६ चे अध्यक्ष स्वप्निल शीला अशोक रोकडे, विक्रात सरला, सचिन खेमा, नगरसेवक वरून पाटील, अभिषेक मोरे, नितीन खेमा, महेश पाल, अनिरुद्ध जाधव, सागर घोडके, संतोष जाधव, सचिन पाटील, तुषार भालेराव, सनी कदम, संतोष हुले, प्रमोद भोय, राजेश कांबळे, गणेश नाईक, सागर भालेराव, आधार सुरदास, गणेश पांढरे, संदीप वाडकर, रोशन गायकवाड, राज भंडारी, रिजवान शेख, सुरेश गमरे, दीपक जाधव, उमेश भारती तसेच सर्व आजी-माजी अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा जागर करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमामुळे परिसरात उत्साह, एकता आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments