'वसंत मुन पुरस्कार - २०२६ ' ज्येष्ठ दामोदर मोरे यांना '
ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, (प्रफुल केदारे)
वसंत मुन हे केवळ आंबेडकरी लेखक, वक्ते, साहित्यिक नव्हते तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट्टर आंबेडकरवादी संशोधक होते. त्यांनी हयात भर संविधानवादी, समाजवादी, बुद्धवादी बाबासाहेब मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. य दि फडके किंवा अरुण शौरी सारख्या जहरी टीकाकारांनाही प्रचंड अभ्यासू उत्तरं दिलीत. त्यामुळेच मुनांचे साहित्य हे प्रामाणिक, प्रांजल आणि सातत्याने सत्याचा आग्रह धरणारे व बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवणारे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस हे वसंत मुन वेल्फेअर फाउंडेशन आयोजित ' वसंत मुन पुरस्कारा' च्या अध्यक्षपदाच्या भुमिकेतुन बोलत होते. हा पुरस्कार सोहळा उल्हासनगर येथील तक्षशिला विद्यालयाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पार पडला. ज्ञानाच्या विश्वात्मक व्यापक संदर्भात वसंत मून यांच्या कार्याचा परिप्रेषक वाढत जातो आणि विश्वापर्यंत तो जातो असेही पुढे सबनीस म्हणाले.
यंदाचा ' वसंत मुन पुरस्कार - २०२६ ' हा ज्येष्ठ आंबेडकरी हिंदी मराठी कवी, कथा कथनकार, मुलाखतकार, साहित्यिक, दामोदर मोरे यांच्यासारख्या गुणी व समर्पित कलावंताला प्रदान करण्यात आला. याचाही आनंद सबनीस यांनी व्यक्त केला. यावेळी वसंत मुन यांच्या चरित्र व साहित्यिक प्रवासावर आधारित ध्वनीचित्र फीत दाखवण्यात आली. तसेच त्यांच्या साहित्यावर संशोधीत ' वसंत मून ( मराठी साहित्य आणि विचार विश्व )' या संशोधिका, लेखिका डॉ.जलदा ढोके गाणार ह्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कमानी टुब्झच्या संचालिका, आंबेडकरी महिला उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज, डॉ प्रकाश वाकोडे, वंचित नेते महेश भारतीय, कमलेश सोनाळे, आय.एम. मोरे, शिवसेना नेते किरण सोनवणे, प्रा. शुक्राचार्य गायकवाड, डॉ आशालता कांबळे हे प्रमुख अतिथी उपस्थितीत होते. या उत्सवाचे आयोजन उमपाच्या नगरसेविका व वसंत मुन यांच्या कन्या अंजली साळवे, चिरंजीव मिलिंद मून व नातू रोहित साळवे यांनी केले. तर संयोजन डॉ.चंद्रकांत साळवे, प्रा.सिंधूताई रामटेके, दिगंबर हजारे, अॕड. प्रफुल्ल कोळी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्पक प्रफुल केदारे ह्यांनी केले. तर आभार प्रदर्शन उज्वला मिलिंद मून यांनी केले. ह्या कार्यक्रमाला अनेक सामाजिक , साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मुंबई , पुणे , ठाणे , कल्याण ,उल्हासनगर लगतच्या
परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments