Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गुरचरण जमिनीवर अतिक्रमणाचा संताप उसळला

 केडीएमसीला


 10 दिवसांचा अल्टिमेटम


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील द्वारली पाडा परिसरात गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या जागेवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे चाळी उभारल्यामुळे तबेला चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयावर धडक देत गोबर खिलाव आंदोलन केले. आंदोलनादरम्यान केडीएमसी आयुक्तांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला शेण चारत आरती करण्यात आली, ज्यामुळे आंदोलनाने वेगळेच स्वरूप घेतले. यापूर्वीही स्थानिक रहिवासी  सौरभ सिंग यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये सौरभ पांडे आणि त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, तसेच तबेला चालवणाऱ्या कुटुंबांनी सहभाग घेतला होता.

 आंदोलनादरम्यान एक म्हैस घेऊन प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, आणि त्या म्हशीच्या पाठीवर केडीएमसी कमिशनर असे लिहून प्रशासनावर निशाणा साधण्यात आला.आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत येत्या दहा दिवसांत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाही तर तीव्र आदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान आय प्रभाग कार्यालयाचे अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी या विषयावर बोलताना संबंधित बांधकामांना नोटीस देण्यात आली होती आणि आता पुन्हा कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे सागितले. मात्र गुरचरण जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर केवळ कागदी कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


Post a Comment

0 Comments