ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण परिसरातील वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी नुकताच वालधुनी नदीपात्रात उतरून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या पाहणी दरम्यान त्यांनी नदीतील विविध ठिकाणांची स्थिती बारकाईने तपासली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनीही त्यांना नदी प्रदूषणाबाबत सविस्तर माहिती दिली. या दौऱ्यात वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर, खजिनदार निशांत कांबळे, दीपक थोरात, गणेश कांबळे, भारती अय्यर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने उपायुक्तांना नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर उपायुक्त रामदास कोकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करून शहराला पुन्हा एकदा स्वच्छ व सुंदर नदीचे वैभव मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे," असे आश्वासन दिले. या पाहणी दौऱ्यास उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे प्रमुख शशिकांत दायमा, रेखा अत्तरदे, सुरेश अहिरे यांनी उपायुक्तांचे आभार मानले.
.jpg)


Post a Comment
0 Comments