ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने शनिवारी ११ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे तर रविवारी १२ एप्रिल रोजी अग्निशमन सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी ११ एप्रिल रोजी कल्याण मधील आधारवाडी फायर स्टेशन येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अग्निशमन विभागाने रक्तदान शिबीर आयोजित केले असून कल्याणकर नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर रविवारी सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्निसुरक्षा विषयी जनजागृती करण्यासाठी सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments