फेरीवाले, अस्वच्छता, दुचाकींची बेशिस्त
पार्किंग पाहून महापौर संतापल्या...
पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता आणि
सुशोभिकरण करण्याच्या दिल्या सूचना
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आली असून या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले चौकाची आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर उद्यानाची लोकप्रतिनिधी, पोलीस आणि केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी महापौरांनी पाहणीत महात्मा फुले यांच्या पुतळ्या शेजारी अस्वच्छता असून मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्या केल्या जातात. फेरीवाले, अस्वच्छता, दुचाकींची बेशिस्त पार्किंग पाहून महापौर संतापल्या.
महात्मा फुले यांच्या जयंतीच्या आधी याठिकाणी स्वच्छता करून पार्किंग करण्यात येणाऱ्या दुचाकी हटविण्याच्या सूचना केल्या. यावेळी पोलिसांनी या दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली. त्याचप्रमाणे या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असून या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्याचे निर्देश देत दोन्ही पुतळ्यांच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, नगरसेवक प्रतिक पेणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यासह वाहतूक पोलीस उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments