ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त कल्याण डोंबिवली शहर परिसरातील केंद्रात आठ दिवसीय सामूहिक पारायण, तारक मंत्रचे पठण करण्यात आले होते. कल्याण पारनाका येथील सेवा केंद्रात सामूहिक पारायणची सांगता करण्यात आली
स्वामी महाराजांनी चैत्र वद्य त्रयोदशी १५ एप्रिल रोजी समाधी घेतल्याने हा दिवस स्वामींचा स्मरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असतो.
कल्याण डोंबिवली शहर परिसरातील स्वामींच्या केंद्रात श्री स्वामी समर्थ चा जयघोष करण्यात आला. कल्याण पश्चिम पारनाका येथील केंद्रात पहाटे पासून स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. २० टक्के अध्यात्म व ८० टक्के समाज कार्य या दिंडोरी प्रणित मार्गाच्या उक्तीनुसार पारनाका सेवा केंद्र येथे आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले. वर्षभरामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे, भव्य रक्तदान शिबिरे, योग शिबिरे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आदिवासी पाड्यांवर व कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती सेवेकरी स्वाती पाचघरे व संज्योत पाचघरे यांनी दिली.
.jpg)



Post a Comment
0 Comments