Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्व भागातील नालेसफाईचा पाहणी दौरा

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड,नगरसेवक पप्पू पिंगळे,नगरसेविका माया कांबळे,तसेच नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी एकत्रित रीत्या कल्याण पूर्वेतील नालेसफाईचा आढावा घेतला.महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत हा पाहणी दौरा  करण्यात आला.



 कल्याण शहरातील विविध नाल्यांची दयनीय अवस्था उघडकीस आली असून, अनेक भाग पूर्णपणे तुंबल्याने पाण्याचा प्रवाह थांबला आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी स्थानिक नगरसेवकांसोबत विभाग ५ 'डी' च्या विविध भागांना भेट देऊन ही गंभीर समस्या पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणली. महेश गायकवाड यांनी विभागाचे सहायक आयुक्त उमेश यमगर आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत वालधुनी, खडगोळीवली आणि तिसगाव परिसरातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या नाल्यांची पाहणी केली.तेव्हा असे आढळून आले की, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता आणि अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह अडकलेला होता.


अनेक ठिकाणी गटार तुंबल्याच्या  तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.पाहणी दरम्यान अनेक  ठिकाणी गटारे पूर्णपणे तुंबलेली आढळून आली आहेत, ज्यामुळे आगामी पावसाळ्यात  पाणी साचण्याची गंभीर स्थिती निर्माण होईल याबद्दल चिंता वाढली आहे. याव्यतिरिक्त, काही भागांमध्ये विकासकांनी गटारांमध्ये बेकायदेशीर राडारोडा टाकून अडथळे निर्माण केल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे गटारांची क्षमता कमी झाली आहे.त्यामुळे कृत्रिम पुराचा धोका वाढला आहे. अशा विकासकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.


त्यांनी बेकायदेशीर अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे. महेश गायकवाड यांच्यासह नगरसेवक पप्पू पिंगळे, मधुर म्हात्रे आणि नगरसेविका माया कांबळे यांनी मागणी केली आहे की, पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पद्धतशीरपणे आणि पूर्णपणे स्वच्छ करावेत आणि भविष्यात अशा बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली


Byte : - महेश गायकवाड ( नगरसेवक )

Post a Comment

0 Comments