Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी निवड

"नागरिकांच्या सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहणार".... उमेश बोरगावकर

सत्ता पैसा गुंडगिरी समोर आमचे दहा नगरसेवक 

एकजूट राहिले   – वरुण सरदेसाई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक उमेश बोरगावकर यांना आज गटनेतेपदाचा पदभार देण्यात आला. यावेळी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.या प्रसंगी वरुण सरदेसाई यांनी उमेश बोरगावकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी विश्वास व्यक्त केला. नवीन जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली गटाचे काम अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

सत्ता पैसा गुंडगिरी समोर आमचे दहा नगरसेवक एकजूट राहिले असून केडीएमसी निवडणुकीत जो सत्ता संघर्ष झाला त्याच्यावर एक नेटफिक्सचा शो होऊ शकतो अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या पालिकेतील गटनेता कार्यलयाच्या उद्घाटनासाठी वरुण सरदेसाई कल्याणमध्ये आले होते, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शक्तीप्रदर्शन केले.


सेना बीजेपीची कागदावर युती असली तरी त्यांचे जमत नाही हे दिसून आले असून त्यामुळे सर्व समित्यांच्या निवडणुकीत दिरंगाई झाली. आता विषय  अजेंडयावर घेऊन विरोधीपक्ष नेत्याचा विषय मिटला पाहिजे. लवकरच उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करतील.

दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका करताना सरदेसाई म्हणाले की, आजच्या राजकारणात उमेदवारापेक्षा कोणाची मते फुटणार यावरच चर्चा होते हे दुर्दैवी आहे. त्यांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षाशी निष्ठा राखणे गरजेचे असल्याचेही अधोरेखित केले. महायुतीवर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी कोण फुटणार, कोण नाही यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. महाविकास आघाडीच्या वतीने लवकरच अधिकृत नाव जाहीर होईल, असे सांगत पुढील राजकीय घडामोडींचा सस्पेन्स कायम ठेवला.


Post a Comment

0 Comments