आकाशवाणी मुंबईचे गायक रघुनाथ फडके यांचा सुरेल गायन सोहळा शेकडो भाविकांची उपस्थिती
शहापूर तालुक्यातील दहागाव येथील स्वामी समर्थ मठ येथे गुरुवारी पुण्यतिथीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकाशवाणी मुंबई केंद्राचे गायक रघुनाथ फडके यांचा विशेष गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी पुजारी यशवंत महाराज गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विनोद घोडविंदे तसेच पत्रकार रमेश घरत यांचे विशेष सहकार्य लाभले. रघुनाथ फडके यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले व संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमानिमित्त सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे दहागाव परिसरात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते. पत्रकार रमेश घरत यांचे विशेष सहकार्य लाभले. रघुनाथ फडके यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले व संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे दहागाव परिसरात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी ह भ प चेतन सपाट महाराज तसेच कोंडू शेलार, विक्रम देसले, मनीष गायकवाड, पद्माकर पाटील, प्रमोद शेळके, बंडू भगत, हरिश्चंद्र कोरडे, सुनील पवणे, श्याम वाडीले या सर्व स्वामी भक्तांनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विशेष सहकार्य केले
.jpg)



Post a Comment
0 Comments