ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे महानगरपालिका हद्दतील प्रभाग क्र.२९ मधील पडले गाव येथील तावशी रस्त्याचे कामं त्वरित चालू करावे अशी मागणी आता होऊ लागली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील पडले गाव ते खर्डी गाव तावशीचा रस्ता १० वर्ष मंजूर होऊन सुद्धा तरी तो रस्ता अपूर्णच आहे.याचे कामं त्वरित चालू करावे आणि रस्ता पूर्णत्वास नेऊन प्रवाश्यासाठी खुला करावा, जेणेकरून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल,अशी मागणी भाजप नगरसेविका वेदिका पाटील यांनी केली आहे.
तसेच दिवा साबे गावात जाण्यासाठी शिळ दिवा मुख्य रस्ता - प्रशांत नगर - साबेगाव असा रस्ता तयार करून साबे गावासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक २९ भौगोलिक दृष्ट्यामोठा असून आणि मोठ मोठे गृहसंकुल या ठिकाणी झालेले असून येथील रहिवासी आणि गावकऱ्यांना तावशी रस्ता होत नसल्याने अनेक अडचणीना समाना करावा लागत आहे. गेले अनेक वर्ष रस्ता हा असाच पडून आहे. आमची विनंती आहे, ठाणे महापालिकेच्या महापौर आणि आयुक्त यांना की यात लक्ष घालून या रस्त्याचे काम त्वरित चालू करावे. जर हा रस्ता तयार झालातर कल्याण फाटा, शिळफाटा येथील होणारे ट्रॅफिक बरेसचे कमी होईल असे भाजप नगसेविका वेदिका पाटील यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments